Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandara Buldhana Chandrapur
Dhule Gadchiroli Gondia Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur
Mumbai City Mumbai Suburban Nagpur Nanded Nandurbar Nashik Osmanabad Palghar
Parbhani Pune Raigad Ratnagiri Sangli Satara Sindhudurg Solapur
Thane Wardha Washim Yavatmal          

प्रस्थाविक

विधिमंडळ

प्रत्येक लोकशाही राष्ट्रात विधिमंडळ महत्वाची कामगिरी बजावण्याचे कार्य करत असते. आपल्या संसदीय लोकशाही शासन पद्धतीमध्ये भारतीय संविधानातील तरतुदीनुसार विधिमंडळाचे काम म्हणजे सरकार बनविणे, सरकारला योग्य प्रकारे वागायला लावणे व प्रसंगी सरकार बदलने, सरकारी कामगाजांवर देखरेख ठेवणे, सरकारी कारभारात गैरप्रकार आढळल्यास त्याबद्दल जाब विचारणे इ. कामे विधिमंडळाची आहेत. या कामांची तीन प्रकारात विभागणी आहेत ती म्हणजे a) वैधानिक, b) आर्थिक, c) टीकात्मक.

विधिमंडळाचे प्रमुख काम म्हणजे विधिनियम किंवा कायदे करणे हे आहे तसेच राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी सर्वांगीण नियोजनाचा म्हणजे राज्याच्या सर्वांगीण अर्थव्यवहाराबद्दलचा राज्य विधिमंडळाला विचार करावा लागतो. राज्यात नवे कर बसविणे, करात वाढ करणे अथवा कर पद्धतीत बदल करणे, अंदाजपत्रक मंजूर करणे, कार्यकारी मंडळ हे विधिमंडळाने संमत केल्याप्रमाणे योग्य प्रकारे खर्च करते किंवा कसे अशा प्रकारचे काम विधिमंडळ करते. विधिमंडळाचे तिसरे आणि महत्वाचे कार्य टीकात्मक स्वरूपाचे आहे. जसे शासन यंत्रणेवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी सदस्य विविध संसदीय आयुधांच्या सहाय्याने जसे प्रश्नोत्तरे, लक्षवेधी सूचना, अर्धा तास चर्चा, स्थगन प्रस्ताव, अविश्वास प्रस्ताव तसेच अन्य विविध प्रकारचे प्रस्ताव, ठराव, राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा, अल्पकालीन चर्चा इ. द्वारे आपली संसदीय व मतदारांप्रती असणारी जबाबदारी पार पाडीत असतात.

महाराष्ट्र राज्य विधानमंडळात राज्यपाल व दोन्ही सभागृहे म्हणजे महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधानपरिषद यांचा समावेश आहे व त्यांचा संयुक्तपणे "विधिमंडळ" असा उल्लेख केला जातो. सर्व साधारणपणे दरवर्षी विधानमंडळाची तीन अधिवेशने होतात. त्यापैकी पहिली दोन म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन व पावसाळी अधिवेशन ही मुंबईत होतात तर हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते.